शवविच्छेदन कक्ष, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासाठी सुधारणा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी असणारे रुग्णालय इथे गरीब सर्वसामान्य माणूस उपचारासाठी येतो.

या ग्रामीण रुग्णालयात मध्ये असणारे शवविच्छेधन खोली खूप जुनी झाली असून तिथे एका वेळी दोन शव आले असता शव ठेवण्यासाठी फ्रीझर नाही. तसेच, खोली खूप लहान असल्यामुळे शवविच्छेधन करण्यातसाठी खूप अडचण होते. म्हणून, आमचे नेते भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ ईश्वर साहेबांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक, कोल्हापूर तसेच आरोग्य संचालक आरोग्यसेवा ,कोल्हापूर यांना भेटून शवविच्छेधन खोली लवकरात लवकर आद्यवत करून मिळावी यासाठी निवेदन दिला.

यावेळी भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय खजिनदार श्री महेश मुराळ व तालुका अध्यक्ष अब्दुलमुन्नाफ मणेर उपस्तिथ होते.

Scroll to Top